Edition

नेताजी पालकर व्यायामशाळेच्या गोविंदा पथकाने चंदगडमध्ये फोडली दहीहंडी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चंदगड येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायामशाळेच्या गोविंदा पथकाने दमदार कामगिरी करत मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली.

दहीहंडी फोडताना गोविंदांनी एकमेकांच्या खांद्यावर खांदा ठेवत उंच मनोरा उभारला. या थरारक क्षणाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि **‘गोविंदा आला रे आला’**च्या जयघोषात उत्स्फूर्त दाद दिली.

संयोजक व शिवसेना प्रेरित बांधकाम उद्योग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत अनगुडे यांच्या हस्ते विजेत्या पथकाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले. आजरा, संकेश्वर व हत्तीवडे येथील पथकांनीही सहभाग घेतल्याने दहीहंडी उत्सवात चांगलीच रंगत निर्माण झाली.

र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष सुनील काणेकर, पं. स. सभापती विलास नाईक, लक्ष्मण गावडे, प्रताप पाटील, दिवाकर पाटील, सागर चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पौर्णिमा राऊत व प्रतिभा राऊत यांनी सूत्रसंचालन केले. उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!