
डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
माकप व किसान सभा लाल बावटा तर्फे सेलूत निदर्शन.
सेलू : दि.15 सप्टें.रोजी सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी माकप व किसानसभा लाल बावटाच्या वतीने मंगळवारी (दि. 15) तहसील कार्यालयासमोर शेतकर्यांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी विविध मागण्यांच्या घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गेल्या 54 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह खरीपातील विविध पिके पाण्याअभावी सुकून वाळली आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करावी, पीकविमा योजनेतील ट्रिगर पूर्ववत करावा तसेच मागील वर्षीची 17 हजार 500 रुपयांची पीकविमा रक्कम शेतकर्यांना तातडीने वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली.यासंदर्भातील मागण्यांचे निवेदनतहसीलदार शिवाजी मगर यांना देण्यात आले. आंदोलनात कॉ. रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे पाटील, दत्तु सिंग ठाकूर, सुभाष शहाणे, उद्धव पौळ, रोहीदास हातकडके, धोंडीराम पातळे, गणपत गोंडगे, सोमेश्वर गिराम, दिनकर रोडगे, पंडित आवटे, विष्णू चव्हाण, भास्कर पौळ, भगवान वाव्हळे, भारत आवटे, बन्सीभाऊ आवटे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.











