
गांधीनगर : प्रतिनिधी
उदय साळुंखे
पारंपरिक वाद्यांच्या निनादात घरगुती गणरायाचे गांधीनगरसह परिसरात भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन झाले.
गांधीनगर, गडमुडशिंगी, चिंचवाड, वळीवडे, निगडेवाडी येथील गणेशभक्तांनी वाजत
गाजत सुंदर सजावट करून घरोघरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पारंपरिक वाद्याची ढोलपथके आली आहेत. या ढोलपथकांचा आगमन मिरवणुकीत लक्षणीय सहभाग राहिला. सकाळपासूनच गणेशाच्या आगमनाची परिसरात लगबग सुरू राहिली. आरास, सुंदर सजावट आणि नयनमनोहर रांगोळ्या रेखाटण्यात गणेशभक्त तल्लीन झाले. घरोघरी आणि गलोगल्ली गणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज होते. रात्री उशिरापर्यंत आगमन मिरवणुका सुरू राहिल्या











