Edition

क्रांतिवीर पांडू मास्तरांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा माजी सैनिक व स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सन्मान; स्मारकातून समाजपरिवर्तनाची नांदी करण्याचा संकल्प..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

येडेनिपाणी गावचे थोर क्रांती सेनानी क्रांतिवीर पांडू मास्तर यांचा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी व अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संपतराव माळी होते. प्रारंभी क्रांतीज्योतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर क्रांतिवीर पांडू मास्तर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडू मास्तरांचे नातू तथा माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील यांनी केले. पांडू मास्तरांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून वाळवा व शिराळा तालुक्यातील माजी सैनिक तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा एकत्रित सन्मान करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
पांडू मास्तरांचे स्मारक उभारण्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण मदत झाली असून, स्मारकाचे काही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे नंदकुमार पाटील यांनी सांगितले. तसेच लोकनियुक्त आमदार सत्यजित आनंदराव पवार यांनीही स्मारकासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने स्मारकाचे काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साहित्यिक भा. ल. ठाणगे यांनी क्रांतिवीर पांडू मास्तर यांच्या देशसेवेचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना येरवडा कारागृहातून पलायन करण्याच्या त्यांच्या धाडसी घटनेचा तसेच इस्लामपूर येथे झालेल्या मोर्चातील लाठीमाराचा संदर्भ त्यांनी दिला. पत्री सरकारच्या उभारणीत पांडू मास्तरांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पांडू मास्तरांच्या स्मारकाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची नांदी व्हावी, असा संकल्प व्यक्त करताना स्मारक परिसरात डिजिटल वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तसेच युवा पिढीसाठी व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे भा. ल. ठाणगे यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात माजी सैनिक संपतराव माळी यांनी येडेनिपाणी येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतिवीर पांडू मास्तरांच्या स्मारकाचा नावलौकिक पश्चिम महाराष्ट्रातील इतर स्मारकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी वाळवा व शिराळा तालुका माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा क्रांतिवीर पांडू मास्तर प्रतिष्ठानतर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक अमर मेथे यांनी केले, तर आभार अर्जुन पाटील यांनी मानले.
यावेळी माजी सैनिक संपतराव माळी, साहित्यिक भा. ल. ठाणगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदकुमार निळकंठ, माजी सैनिक बाळकृष्ण सावंत, नौशाद तांबोळी, अशोक पाटील, संजय जाधव, सीताराम पाटील, रामराव शेवाळे, अर्जुन पाटील, शहाजी पाटील यांच्यासह वाळवा व शिराळा तालुका माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!