Edition

“मरण पत्करेन, पण सरकारपुढे झुकणार नाही!”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे एल्गार; १९ सप्टेंबरला आझाद मैदानात उपोषणाचा निर्धार.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या निर्धाराने ते रवाना झाले असून, प्रकृती खालावलेली असतानाही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सलाईन किंवा पाणी न घेतल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी, “मरण पत्करेन; पण सरकारला शरण जाणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला. मराठा समाजातील गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
जरांगे पाटील यांच्या मुंबई प्रवासादरम्यान विविध ठिकाणी मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील हडपसर, पाटोदा तसेच रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे त्यांचा मुक्काम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. १९ सप्टेंबर रोजी मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदानात उपोषणाला बसण्यावर ते ठाम आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. मात्र, परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर नेण्यासाठी मुंबईत मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच जरांगे पाटील यांनी समाजाला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. “एकजूट दाखवा, शांतता राखा आणि आपल्या मागणीसाठी ठामपणे उभे रहा,” असा संदेश त्यांनी मराठा समाजाला दिला आहे.
प्रकृतीची चिंता आणि प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आलेली असतानाही जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाल्याने आगामी आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील काळात कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!