Edition

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटेचालीला ‘गावडे कुटुंबाचा’ हातभार; बुझवडे जिल्हा परिषद विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे,​चंदगड प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत गावडे परिवारामार्फत चंदगड तालुक्यातील बुझवडे येथील जिल्हा परिषद विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
​या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन-पेन्सिल, कंपास पेटी आदी आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, तसेच त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने सहज उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
​”प्रत्येक दप्तर म्हणजे केवळ एक बॅग नाही, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची सुरुवात आहे. प्रत्येक वही म्हणजे त्यांच्या भविष्याची कोरी पाने आहेत.” – गावडे परिवार
​विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मिळालेला आधार हा या उपक्रमाचा खरा उद्देश ठरला. “तुम्ही फक्त शिका आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करा,” असा संदेश देत गावडे कुटुंबाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
​गावडे कुटुंबाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद
​समाइतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे, हेच खऱ्या सामाजिक बांधिलकीचे लक्षण आहे. गावडे परिवाराचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरला असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चितच मोलाचे योगदान ठरत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!