
हुपरी प्रतिनिधी – दिनांक 6/9/2026 रोजी सायंकाळी 5:40 वाजताच्या सुमारास जवाहर साखर कारखाना ते कारदगा जाणाऱ्या रोडवर काही अज्ञानतांनी आरटीआय कार्यकर्ते अशोकराव खाडे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते त्याचा तपास जिल्हापोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांनी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश देत स्थानिक गुन्हे अन्वेषण व हुपरी पोलीस यांनी समांतर तपास करावा यामध्ये अखेर युवराज पाटील व योगेश गोसावी यांनी आपल्या तपास यंत्रणेची चक्रे फिरवत घटनास्थळावरील वर्णन व त्या रोडचे सीसीटीव्ही फुटेज याद्वारे व गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आज तपोवन मैदान येथे रेकॉर्डवरील आरोपी जयकुमार ढंग हा येणार असल्याचे समजले असता त्याच्यासह गुन्हयातील इतर दोन आरोपी ही जेरबंद करण्यास हुपरी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांचे पथक निवुत्ती माळी,अमित सर्जे,समीर कांबळे,राजु कोरे,यांनी सापळा रचत त्यांना अटक केली हुपरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सत्यवान हाके,व पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे अन्वेषणला या तपासकामी मदत केल्याने आरोपींचा शोध लागणे सोयीस्कर झाले अखेर पैशाच्या देवाण-घेवाणीतून सांगलीच्या मुख्य सूत्रधार असलेल्या अमृत सावंत (ढंग)रा.सागंली यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार जयकुमार ढंग व.व.28 (रा.शास्त्रीनगर सध्या राहणार देवकर पाणंद) 2)अभिजीत बाळासो पाटील व.व.34 (रा.देवकर पाणंद) 3)फिरोज उर्फ अल्लाबक्ष साजिद शेख व.व.25 (राहणार सरनाईक वसाहत जवाहर नगर)व स्वतःचा अमृत सावंत (ढंग)रा.सागंली यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले पण सध्या अमृत सावंत हा फरार असून यांचा शोध सुरू असल्याचे समजले त्या आरोपींना अधिक तपासासाठी हुपरी पोलिस स्टेशन याच्या ताब्यात दिले असुन आरोपी यांनी कबुली देत आम्ही अमुत ढंग यांच्या सांगण्यावरून बलेनो कार मधून येऊन अशोक खाडे यांना मारहाण केले असुन आरोपी जयकुमार ढंग यांच्यावर शरीराविरुधीचे राजवाडा पोलिस स्टेशन येथे सात गुन्हे दाखल असल्याचे ही निष्पन्न झाले या तपास कामी जिल्हा पोलीस प्रमुख निलोप्पल बसू पोलीस अप्पर अधीक्षक अण्णासाहेब जाधव इचलकरंजी विभागीय पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण,हुपरी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे,पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे,युवराज पाटील व योगेश गोसावी,निवुत्ती माळी,अमित सर्जे,समीर कांबळे,राजु कोरे,शुभम सकंपाळ,रोहीत मर्दाने,अमित मर्दीने,संजय हुंबे,सतिश जंगम,सुशिल पाटील,हुपरी पोलीस स्टेशनचे सुकुमार बरगाले,पवन गुरव, युवराज गोडसे,भरत कोरवी यांनी हा तपास पुर्ण केला.











