Edition

निप्पाणी तालुका दलित संघर्ष समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड उत्साहात.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

निप्पाणी : प्रो. बी. कृष्णाप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती (रि.) निप्पाणी तालुका शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड व कार्यकर्ता संवाद मेळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, निप्पाणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अल्पसंख्यांक विभागीय राज्य संघटना संचालक मा. रफिक बोकरे सर उपस्थित होते. बेळगाव जिल्हाध्यक्ष मा. परशुराम वन्चूमोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निप्पाणी तालुका अध्यक्ष मा. लक्ष्मण माने होते.
यावेळी बेळगाव जिल्हा महिला घटक अध्यक्ष मा. सत्याव्वा कांबळे यांची विशेष उपस्थिती लाभली. निप्पाणी तालुका महिला घटक अध्यक्ष मा. सुधा माळगे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
कार्यकर्ता संवाद मेळाव्यात निप्पाणी तालुका व शहर तसेच विविध ग्राम घटकांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
निप्पाणी शहर अध्यक्षपदी – जुगनू सकट
निप्पाणी शहर उपाध्यक्ष – सनी चौगुले
निप्पाणी तालुका कार्याध्यक्ष – प्रशांत कोरवी
निप्पाणी तालुका मीडिया उपाध्यक्ष – अविनाश ऐव्होळे
कारदगा जिल्हा पंचायत (ZP) अध्यक्ष – रवी ऐव्होळे
बोरगाव ग्राम घटक अध्यक्ष – अनिल कोरवी
शिरगुप्पी ग्राम घटक अध्यक्ष – गणपती घस्ते
सभेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रो. बी. कृष्णाप्पा यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला. शोषित, वंचित व बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच सामाजिक समतेसाठी सातत्याने संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले.
महिला सक्षमीकरणावरही विशेष भर देण्यात आला. संघटनेत महिलांचा सहभाग वाढवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि महिलांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
नूतन पदाधिकाऱ्यांनी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घ्याव्यात तसेच शासकीय योजना व सुविधांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास निप्पाणी तालुका उपाध्यक्ष दिपक केंगारे, उपाध्यक्ष राम माळगे, सौदलगा जिल्हा पंचायत अध्यक्ष सोनल कांबळे, तालुका कार्यदर्शी अमोल कांबळे, तालुका प्रधान कार्यदर्शी पांडुरंग कांबळे तसेच महिला तालुका उपाध्यक्ष, महिला पदाधिकारी, संघटनेचे विविध पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्ता संवाद मेळाव्यामुळे संघटनेच्या आगामी सामाजिक व जनहिताच्या कार्याला नवी दिशा मिळाली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!