Edition

श्री भावेश्वरी चव्हाटा गणेशोत्सव मंडळात गणरायाच्या आगमनाची उत्सुकता. _संभाजी चौकात गणेशोत्सवाची जय्यत तयारी; अध्यक्ष सुमित देसाई यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज_

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे, चंदगड प्रतिनिधी – कानूर बुद्रुक : गणेशोत्सवाचे दिवस जवळ येत असताना कानूर बुद्रुक येथील श्री भावेश्वरी चव्हाटा गणेशोत्सव मंडळात गणरायाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संभाजी चौकात गणरायाचे भव्य स्वागत करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

मंडळाचे अध्यक्ष सुमित देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष, सचिव, खजिनीस, सदस्य तसेच गावातील इतर कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या नियोजनात सक्रिय झाले आहेत. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच युवकांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण आतुर झाले आहेत.

संभाजी चौकात दरवर्षी गणेशोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. यंदाही गणेशोत्सव सामाजिक सलोखा, एकोपा आणि भक्तिभावाने साजरा करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध तयारी केली जात आहे.

गणेशमूर्तीच्या आगमनावेळी **‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’**च्या जयघोषाने संभाजी चौकासह परिसर दुमदुमणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मंडळाचे कार्यकर्ते उत्साहाने तयारी करत असून, उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे.

अध्यक्ष सुमित देसाई यांच्यासह मंडळाचे उपाध्यक्ष, सचिव, खजिनीस, सदस्य आणि इतर कार्यकर्त्यांनी गणरायाच्या आगमनासाठी कंबर कसली असून, आता सर्वांना बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!