Edition

जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सेलू मानवत रोड वर रास्ता रोको.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू-मानवतरोडवरील
गोगलगाव पाटीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. सरकारने अद्याप या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नसल्याने मराठा समाज अधिक आक्रमक झाला असून ठीक ठिकाणी रस्ता रोको, चक्का जाम आंदोलन करण्यात येत असून सेलू तालुक्यातील सेलू परभणी रोडवरील गोगलगाव पाटीवर मराठा समाजाच्या वतीने आज दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता जोरदार आक्रमण करून रस्ता रोको करण्यात आला. त्याच बरोबर पाथरीत सेलू कॉर्नर वर रस्ता रोको करण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याप्रसंगी सकल मराठा समाजातील प्रसाद महाराज काष्टे यांनी शासनाचा निषेध व्यक्त करत उपस्थित सर्व मराठा समाजाला आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तो हा लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत आम्ही सेलू तालुक्यातील सर्व मराठा समाज हा त्यांच्या समर्थनात कुठलाही विचार न करता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि राहणार आहे. शासन जो पर्यंत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत आम्ही हा लढा देत राहू.आज गोगलगाव पाटीवर रस्ता रोको केले उद्या सेलू बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. यावेळी निपाणी टाकळी, गोगलगाव, आंबेगाव, पिंपळगाव, करडगाव, काजळी रोहिणा आदी परिसरातील मराठा समाज उपस्थित राहून शासनाचा निषेध करत असल्याचे दिसून येत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!