Edition

सरनोबतवाडीतील अवैध दारू अड्डा बंद; रिपब्लिकन सेनेच्या लढ्याला अखेर यश!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

करवीर/प्रतिनिधी उदय साळुंखे

सरनोबतवाडीतील व सरनोबतवाडी दत्त गल्ली परिसरात बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा अड्डा अखेर बंद झाला आहे. या अड्ड्यामुळे परिसरातील शांतता भंग पावली होती आणि महिलांची सुरक्षितता तसेच तरुणांचे भविष्य धोक्यात आले होते.
तरुण पिढी ही व्यसनाच्या नादी न लागता सुरक्षित राहावी, यासाठी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही मोहीम राबवली. पत्रकार मित्रांनीही आपल्या लोकप्रिय दैनंदिन मधून अवैध दारू व्यवसायाला वाचा फोडत वारंवार बातम्या प्रसिद्ध केल्या, ज्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
या यशस्वी लढ्याबद्दल गांधीनगर पोलीस प्रशासन, रिपब्लिकन सेना पदाधिकारी, जय भीम तालीम मंडळ आणि सर्व पत्रकार मित्रांचे मनापासून अभिनंदन. परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
दरम्यान, सरनोबतवाडीसोबतच गांधीनगर, चिंचवड आणि वळवडे परिसरातही जर असेच अवैध धंदे सुरू असतील, तर तिथेही लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी या भागातील पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहून धडक मोहीम राबवावी, जेणेकरून सामान्य नागरिक भयमुक्त वातावरणात जगू शकतील.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!