Edition

कायद्याच्या चौकटी पाळून गणेशोत्सव उत्साहात साजरा करा; पारंपरिक वाद्यांच्या वापर करा पोलीस अधीक्षक – निलोत्पल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने लोकप्रतिनिधी,गणेश मंडळ पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शांतता कमिटी सदस्य यांची गणेशोत्सव सन – 2026 अनुषंगाने सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड,पोलीस अधीक्षक निलोत्पल, शहर उपअधिक्षक प्रिया पाटील , करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक श्री.निलोत्पल म्हणाले, गणेश मूर्तीचा आकार डॉल्बीचा आवाज , मंडळाभोवती जमणाऱ्या नागरिकांची संख्या, मोठा मंडप यावर गणेशाची श्रद्धा ठरत नाही. कोल्हापूरला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. गणेशोत्सवामध्ये लेझरचा वापर करु नका . डीजेला बंदी नसली तरीही आवाजाची मर्यादा पाळा . Co2 (गॅस) ला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देण्यात येणार नाही तसेच मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर द्यावा. महाप्रसादाचे चेकिंग एफडीए मार्फत करण्यात येईल ,गणेशोत्सव कालखंडात पोलीस विभागातर्फे 24×7 एक कंट्रोल रूम कार्यरत ठेवण्यात येईल.बाप्पाच्या आगमन – निर्गमना वेळी मंडळांनी चांगले स्ट्रक्चर ठेवावे जेणेकरून कोणती दुर्घटना घडणार नाही . तसेच सर्वच मंडळासाठी पोलीस प्रशासन समान कायदा वापरणार असून जिल्ह्यातील मंडळांनी या कालखंडात प्रत्येकी दोन – दोन सीसीटीव्ही लावण्याला प्राधान्य द्यावे त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर गणेश मंडळांनी महाद्वार रोड ऐवजी इतर पर्यायी मार्गाचाही विचार करावा असे आवाहन केले .

                    याप्रसंगी शांतता व दक्षता समितीचे सदस्य तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या. या मिरवणूक काळामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक द्यावा, मिरवणूक मार्गावर विद्युत व्यवस्था सुरळीत रहावी, सर्व गणेश मंडळांना महाद्वार रोडवरील मिरवणुकीत सहभागी होता येण्यासाठी मिरवणूक रेंगाळणार नाही यासाठी उपाययोजना व्हावी, सर्व मंडळांना समान न्याय द्यावा, शहरातील रस्त्यांची श्री गणेश आगमनापूर्वी दुरुस्ती व्हावी, आदी सूचना मांडून कोल्हापूरचा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला दिले. महा समितीच्या वतीने जिल्ह्यातील गणेशोत्सव सुरळीत पार पाडावा यासाठी विविध सूचनांचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना यावेळी  देण्यात आले . याप्रसंगी पोलीस विभागातील इतर अधिकारी – कर्मचारी तसेच विधिध मंडळाचे आजी माजी अध्यक्ष – पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!