Edition

चिक्कोडीत ३ सप्टेंबरला ‘रक्तदानाचा महायज्ञ’; प्रत्येक ग्रामपंचायतीला २० रक्तदात्यांचे लक्ष्य!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी. चिक्कोडी,ता येथील पंचायत चिक्कोडीच्यावतीने गुरुवारी (ता. ३) चिकोडी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये स्वयंस्फूर्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीसाठी कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान २० रक्तदात्यांची नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रक्तदात्याचे वय १८ ते ५५ वर्षे असावे, तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण किमान १२.५ ग्रॅम आणि वजन ४५ किलो असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रक्तदात्यांना केंद्रस्थळापासून चिकोडी हॉस्पिटलपर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या. रक्तदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये आणि संपूर्ण शिबिर सुरळीत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावे, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रियपणे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. खनदाळे, रक्तदान शिबिराचे नोडल अधिकारी तथा अक्षर दासोहचे सहायक संचालक महादेव जनगौड, सहायक संचालक शिवानंद शिरगावी, पंचायत राजचे सहायक संचालक एम. आर. कोटवाल, आदर्श ब्लड बँकेचे डॉ. राजीव टिक्के तसेच चिकोडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे पंचायत विकास अधिकारी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!