Edition

परभणी च्या प्राथमिक विभागाच्या नूतन शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांचा राज्य राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त संघा तर्फे सत्कार.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

विविध मागण्यांचे दिले निवेदन.

परभणी : दि.31 ऑगस्ट रोजी येथील राज्य राष्ट्रीय शिक्षक संघाच्या वतीने प्राथमिक विभागाच्या नूतन शिक्षणाधिकारी श्रद्धा झिंजूरके यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी व सेलूचे गटशिक्षणाधिकारी गजाननन वाघमारे, राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश ढवारे,उपाध्यक्ष छाया गायकवाड, जिल्हा सचिव शिवप्रसाद मठपती,सहसचिव रत्नमाला शेळके व मुख्य संघटक संतोष चिद्रवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी झिंजूरके मॅडम यांचा शाल, योगेश ढवारे लिखित भाषण एक कला ही पुस्तिका व वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला व विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा परिचय करून दिला.
यात प्रमुख मागणी म्हणजे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नावाचे फलक लावणे हीं होती.जिल्हा परिषद परभणी अंतर्गत कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल राज्य शासन तसेच भारत सरकारच्या वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. या पुरस्कारामुळे केवळ त्या शिक्षकांचा नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचा गौरव वाढलेला आहे. या पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा, नवोदित शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच विद्यार्थी, पालक व सर्वसामान्य नागरिकांना जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची माहिती व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद परभणी येथील प्राथमिक, माध्यमिक व योजना विभागाच्या कार्यालयामध्ये वाशीम, हिंगोली, नागपूर या जिल्ह्याप्रमाणे आपल्याही परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे, शाळेचे नाव, पुरस्काराचे वर्ष व छायाचित्र (शक्य असल्यास) यांचा समावेश असलेला आकर्षक सन्मान फलक लावण्यात यावा, ही नम्र विनंती आहे.
या उपक्रमामुळे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होईल, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन मिळेल आणि इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होईल.त्यामुळे आपल्या स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करून सदर विनंती मान्य करावी, ही नम्र विनंती अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.
Pशिक्षण अधिकारी प्राथमिक श्रद्धा झिंजूरके यांनी देखील या उत्कृष्ट कार्यास शुभेच्छा देऊन निश्चित असा फलक लावण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन दिले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!