Edition

सरनौबतवाडीत अवैध दारू विक्रीविरोधात रिपब्लिकन सेनेचा आंदोलनाचा इशारा; ७ दिवसांत दारू अड्डा बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर/प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील सरनौबतवाडी (जय भीम तालीम मंडळ, दत्त गल्ली) येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक झाली आहे. गोविंद बाळू अभंग्ये आणि त्यांची पत्नी शशिकला गोविंदा अभंग्ये यांच्याकडून सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रीमुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरगुती हिंसा, गुन्हेगारी, युवकांचे व्यसनाधीन होणे आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कडक कारवाई करून दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल घेऊन ७ दिवसांत हा दारू अड्डा कायमस्वरूपी बंद न केल्यास, रिपब्लिकन सेना व सरनौबतवाडी ग्रामस्थांच्या वतीने आगामी ७ सप्टेंबर २०२६ रोजी दु. १२:०० वाजता सोशल मीडियाला सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देताना- रिपब्लिकन सेनेचे करवीर तालुका अध्यक्ष श्री. भीमराव आनंदा गोंधळी यांच्यासह सागर कुरडे जिल्हा महासचिव,प्रविण आजरेकर कोल्हापूर शहर अध्यक्ष,विनोद कांबळे, अमोल कांबळे युवा जिल्हा अध्यक्ष,रवि कांबळे युवा उपाध्यक्ष,अर्जुन कांबळे करवीर महासचिव,सुरज आवळे, रविंद्र चौगुले, रसिका चौगुले, अर्जुन गोंधळी करवीर महासचिव,साहिल कांबळे आणि सुशांत कांबळे प्रमुख उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!