पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
नारळी पौर्णिमा रक्षाबंधन कार्यक्रम ह्या दिवशी पद्मशाली सामाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कंडेय महामुनींची भव्य रथ शोभा यात्रा भवानी पेठ विठ्ठल मंदिर पुणे येथून काढण्यात आली. पद्मशाली पुरम भवानी पेठ येथून रामोशी गेट, कस्तुरी चौक, स्वामी समर्थ मंदिर, पालखी विठोबा मंदिर, हमाल तालीम, नवरंग मंडळ, ए डी कॅम्प चौक, पद्मशाली विठ्ठल मंदिर, प पेद्दा पौशव्वा, कामगार मैदान, इथून मार्कंडे मंदिर येथे आरती करून समारोप करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सकाळी ध्वजारोहण, महाअभिषेक, होमहवन, रक्षाबंधन, मार्कंडेय महामुनींची आरती करुन महाप्रसाद वाटप करण्यात आली.
याप्रसंगी सर्व समाज बांधव मित्र परिवार या मिरवणुकीत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच पद्मशाली समाजाच्या वतीने भवानी पेठ विठ्ठल मंदिरामध्ये गोकुळ अष्टमी सप्ताह निमित्त अखंड विणा हरिनाम सप्ताह साजरा केला जातो,यास १०७ वर्ष पूर्ण झालेत ,तसेच रोज रात्रो ९ ते १० प्रवचनाचा कार्यक्रम असतो,४ तारखेला हभप गणेश आवजी महाराज यांचे प्रवचन किर्तन कृष्ण जन्मष्टमी च्या दिवशी आहे आणि ५ तारखेला गोपाळकाला हभप गणेश आवजी महाराज यांचे प्रवचन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शोभायात्रा मिरवणुकीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासणे, नगरसेवक विशाल धनवडे, अर्चना पाटील, मृणाली कांबळे ,अजय खेडेकर, माजी नगरसेवक अविनाश बागवे, सरपंच रविंद्र रच्चा,मनिष अंदे, महेश यमजाल, संजय चिलका, राहुल येमुल,संजय मंचे, ज्ञानेश्वर बोड्डू, सदांनंद अंदे, संजय ईरमल, नंदकुमार कुंदेन, आदि उपस्थित होते.











