Edition

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त लॉयल सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
हजरत महंमद पैगंबर जयंती निमित्त सिनेगौग स्ट्रीट पारशी आगारी टेम्पल कॅम्प पुणे येथे लॉयल सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 62 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आले या शिबिराचे आयोजन लोॅयल सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तौसीफ ख्वाजा पठाण यांनी केले होते. या शिबिराला अक्षय ब्लड बँकचे डॉ यश खुडे, आयुष पवार, जीवन गायकवाड, राहुल मदने, तंजिला बागवान, समृद्धी सावंत, यांनी सहकार्य केले.
यावेळी प्रमुख पाहुणे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचचे इलियाज शेख, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मी कांबळे, सचिव सलमान शेख, कार्यकारी सदस्य मकबुल बागवान, पौर्णिमा आव्हाडे, सदस्य मगदुल खान, रेशमा रोडे, आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!