Edition

घरात घुसून युवतीची चाकूने हत्या; जिम ट्रेनरवर संशय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिल्ली वृत्तसेवा : तिलक नगर परिसरात घरात एकटी असलेल्या मुस्कान या युवतीची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुस्कान विद्यार्थीनी असून पार्टटाइम मॉडेलिंगही करत होती. या प्रकरणात इमरान नावाच्या जिम ट्रेनरवर संशय असून तो घटनेनंतर फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्कान घरात एकटी असताना इमरान तिच्या घरी आल्याचा संशय आहे. त्याने चाकूने तिच्यावर अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या मुस्कानला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मुस्कानचा भाऊ आकाश आणि तिचा मित्र अमन यांनी इमरानवर संशय व्यक्त केला आहे. मुस्कान ज्या जिममध्ये जात होती, त्याच ठिकाणी इमरान ट्रेनर म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात आले. इमरान गेल्या काही काळापासून मुस्कानचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याचा दावा अमनने केला आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून आकाशने फुटेजमध्ये इमरानला ओळखल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, इमरानचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद किंवा अन्य कारणातून ही हत्या झाली का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!