Edition

चंदगडच्या लेकीची एमपीएससीत दैदिप्यमान कामगिरी!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

श्रद्धा पाटील राज्यात मुलींमध्ये अव्वल; एक्साईज इन्स्पेक्टरपदी निवड

संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी : तडशीनहाळ (ता. चंदगड) येथील श्रद्धा मालसराव पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातील अत्यंत चुरशीच्या परीक्षेत मुलींमधून प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक (Excise Inspector) या पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे चंदगड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर श्रद्धा यांनी हे यश मिळवले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.

श्रद्धा यांचे प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी उच्च शिक्षण घेत एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यासातील सातत्य, योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले.

श्रद्धा यांच्या यशामागे त्यांचे आई-वडील, कुटुंबीय, शिक्षक तसेच मार्गदर्शकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश त्यांच्या यशातून मिळत आहे.

चंदगड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी श्रद्धा पाटील यांचे यश प्रेरणादायी ठरले असून, त्यांच्या पुढील शासकीय सेवेसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!