Edition

चिकोडीत ‘पत्रकार भवन’ उभारणीसाठी जागा मंजूर करा कर्नाटक राज्य कार्यरत पत्रकार संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; उपविभागाधिकारी सुभाष संपगावी यांना निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने चिकोडी.

चिकोडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव : शैक्षणिक जिल्ह्याचे केंद्र असलेल्या चिकोडी शहरात कार्यरत अधिकृत पत्रकारांसाठी ‘पत्रकार भवन’ उभारण्यात यावे, यासाठी लवकरात लवकर योग्य भूखंड मंजूर करावा, अशी मागणी कर्नाटक राज्य कार्यरत पत्रकार संघाच्या चिकोडी तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील निवेदन गुरुवारी उपविभागाधिकारी सुभाष संपगावी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याच्या व्याप्तीत जनतेच्या हिताचे रक्षण करण्याबरोबरच शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम शेकडो पत्रकार विविध दैनिके व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अहोरात्र करत आहेत.

चिकोडी शहरात सध्या विविध शासकीय विभागांची ५० हून अधिक कार्यालये असून, त्यापैकी सुमारे १५ ते २० कार्यालये जिल्हास्तरीय आहेत. शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पत्रकार सातत्याने कार्यरत असताना, पत्रकारांना बैठका, पत्रकार परिषदा, वृत्तसंकलन तसेच अन्य कामकाजासाठी स्वतःचे कार्यालय उपलब्ध नाही.
पत्रकारांचे कामकाज अधिक सुरळीत आणि प्रभावीपणे चालण्यासाठी ‘पत्रकार भवन’ असणे अत्यंत आवश्यक आहे.

या भवनामुळे पत्रकारांना एकत्रितपणे काम करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल तसेच नागरिकांनाही पत्रकारांशी सहज संपर्क साधता येईल. त्यामुळे चिकोडी शहरातील मध्यवर्ती व नागरिकांना सोयीस्कर अशा ठिकाणी पत्रकार भवनासाठी भूखंड मंजूर करून देण्यात यावा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोळी, कर्नाटक माध्यम अकादमी पुरस्कार विजेते संजीव वसंत कांबळे, चंद्रशेखर चिनकेकर, चेतन होळेप्पगोळ, विमला चिनकेकर, काशिनाथ सुळकुडे, सुशांत जमखंडीकर, अनिल दलाल यांच्यासह पत्रकार संघाच्या तालुका शाखेचे पदाधिकारी आणि अनेक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!