Edition

गांधीनगरच्या कचरा समस्येवर आक्रमक; पीपल्स पार्टीचे गांधीनगर शहराध्यक्ष सागर कोलप यांचा प्रशासनाला व्हिडिओ माध्यमातून इशारा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:प्रतिनिधी/उदय साळुंखे, गांधीनगर, वळीवडे आणि चिंचवड परिसरात कचऱ्याची गंभीर समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. परिसरातील ग्रामस्थांना विविध आजारांचा सामना करावा लागत असून, दुर्गंधीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीने वारंवार तोंडी आवाहन करूनही, कचरा टाकण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. यावरून पीपल्स पार्टीचे गांधीनगर शहराध्यक्ष सागर कोलप यांनी व्हिडीओच्या माध्यमातून या समस्येचा तीव्र निषेध नोंदवला आहे. ग्रामपंचायत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत, कचऱ्याचा त्वरित उठाव करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. लवकरात लवकर स्वच्छता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

error: Content is protected !!