
विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे केवळ परीक्षेपुरते न पाहता तो आनंददायी, नियोजनबद्ध आणि उद्दिष्टपूर्ण पद्धतीने करावा.
वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण सराव, प्रभावी पुनरावृत्ती आणि तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर यातून यशाचा मार्ग सुकर होतो, असा प्रेरणादायी संदेश पायोनियर एज्यु. हबचे संचालक व शैक्षणिक सल्लागार विनायक यादव यांनी दिला.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल येथे मा. विकास खारगे (आय.ए.एस.), अपर मुख्य सचिव, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने, माजी विद्यार्थी संघ, राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी फाउंडेशन व अभ्यास गट यांच्या सहकार्याने आयोजित मोटिवेशन व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पी. ए. पाटील सर पाहुण्यांचा परिचय करून दिला.मुख्याध्यापक शंकर पोवार सर यांनी प्रास्ताविककेले.
यावेळी व्यासपीठावर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील मांगलेकर, पदाधिकारी राजू नदाफ, महेश खांडेकर, विजय हावळ, रफिक मुल्ला तसेच पी. ए. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा वसंत सपकाळे व सुनील मांगलेकर यांच्या हस्ते फुलांचे रोप देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेचे मुख्याध्यापक शंकर पोवार सर यांनी ‘शाहूंच्या आठवणी’ हे पुस्तक देऊन मान्यवरांचा सन्मान केला. शाळेचे सन्माननीय माजी विद्यार्थी व प्रेरणास्थान *मा. विकास खारगे साहेब* यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा यावेळी गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
यानंतर प्रमुख वक्ते *मा.विनायक यादव सर* यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, प्रभावी नोट्स तयार करण्याची पद्धत, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेणे, पुनरावृत्ती, सराव आणि मोबाईलचा योग्य वापर याबाबत अत्यंत प्रभावी व मार्गदर्शक व्याख्यान दिले.
“अभ्यासाचे वेळापत्रक Flexible, Realistic आणि Individual असावे,” असे सांगताना त्यांनी अभ्यासासोबत विश्रांती, व्यायाम, ध्यान, पेपर सोडविणे, झोप आणि इतर आवश्यक बाबींचेही योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला.
‘1/3 Rule’, स्वतःच्या भाषेत नोट्स तयार करणे, संकल्पना, महत्त्वाचे मुद्दे, सूत्रे, तारखा व व्याख्या यांची स्वतंत्र नोंद करणे, तसेच चित्रे, आकृत्या, तक्ते, Flow Chart, Audio-Video यांचा प्रभावी वापर करण्याच्या टिप्स त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
परीक्षेची तयारी करताना विषय व घटकांचे Weightage, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, गुणांकन पद्धती आणि परीक्षेचे अपेक्षित स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये आवड, कुतूहल आणि उद्देश निर्माण करावा, प्रश्न विचारावेत, शंका त्वरित दूर कराव्यात, समूहचर्चा करावी आणि विविध विषयांतील परस्परसंबंध समजून घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
मोबाईल हा अडथळा नसून योग्य वापरल्यास अभ्यासाचे प्रभावी साधन ठरू शकतो, असे सांगत ChatGPT, इंटरनेट, YouTube, WhatsApp, Zoom आणि मोफत अध्ययन साहित्याचा मर्यादित व नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर Screen Time, Silent Mode आणि Digital Wellbeing याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
परीक्षेच्या तयारीत किमान तीन वेळा पुनरावृत्ती, प्रश्नपत्रिका सोडविणे, प्रश्नपत्रिकेचे वाचन, प्रश्नांचा क्रम बदलून सराव, इतरांना शिकविणे आणि सातत्यपूर्ण सुधारणा या सूत्रांवर त्यांनी विशेष भर दिला.
शिवाजी महाराज, अल्बर्ट आईन्स्टाईन,अमिताभ बच्चन, अंबानी ,विराट कोहली इ.व्यक्तिमत्वे कशी मोठी झाली याचीही माहिती दिलीय.
विनायक यादव यांच्या ओघवत्या, संवादात्मक आणि विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा शैलीतील व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून संवाद साधला. संपूर्ण व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह, सहभाग आणि एकाग्रता विशेष जाणवत होती.
“नियोजनबद्ध अभ्यास + योग्य दिशा + सातत्यपूर्ण सराव + आत्मविश्वास = यश” हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविणारे हे व्याख्यान त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस नवी ऊर्जा देणारे ठरले.
हा कार्यक्रम विशेष यशस्वी करण्यासाठी पी. एल. पाटील सर, नितेश शिंदे सर, तुषार जगताप सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. ए. पाटील सर यांनी केले.











