Edition

खासदार धनंजय महाडिक यांच्या शिफारशीवरून शिवनाथ बियाणी यांची DRUCC सदस्यपदी पुनर्नियुक्ती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती (DRUCC) सदस्यपदी श्री. शिवनाथ बियाणी यांची सन २०२६-२८ या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार श्री. धनंजय महाडिक यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवनाथ बियाणी हे यापूर्वी सन २०२४-२६ या कालावधीत DRUCC सदस्य म्हणून कार्यरत होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या विकासासह पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, प्रवासी सुविधा तसेच रेल्वेच्या विकासकामांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
प्रवाशांच्या हिताचे अनेक प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्याची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांची २०२६-२८ या पुढील कार्यकाळासाठी पुनर्नियुक्ती केली आहे.
या पुनर्नियुक्तीमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि विकासकामांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडण्याची संधी मिळणार आहे. बियाणी यांच्या पुनर्नियुक्तीचे कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रातून स्वागत होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!