Edition

हाजगोळी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाला सील _ग्रामसेवकांच्या कारभाराबाबत ग्रामस्थांची तक्रार; चौकशीचे आदेश, दप्तर तपासणीची मागणी_

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे,चंदगड प्रतिनिधी : हाजगोळी खुर्द (ता.आजरा ) येथील ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवकांच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सील करण्यात आले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांनी काही ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय सील केले.

१५ ऑगस्ट रोजी झालेल्या गावसभेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसेवकांची भेट घेऊन संबंधित प्रश्नांबाबत स्पष्टीकरण मागितले. मात्र, यावेळी समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने ग्रामस्थ आणि ग्रामसेवक यांच्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी ग्रामसेवकांच्या कारभाराबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करतात, मासिक सभेच्या रितसर नोटिसा पाठविल्या जात नाहीत तसेच सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, अशा विविध बाबी तक्रारीत नमूद करण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी तसेच नियमाप्रमाणे कारभार व्हावा, यासाठी संबंधित ग्रामसेवकाच्या कामकाजाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत कार्यालय सील केले. या कारवाईमुळे गावात चर्चेला उधाण आले असून, ग्रामपंचायतीच्या दप्तराची तपासणी आणि चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

संबंधित अधिकाऱ्याच्या कारभाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी त्यांची बदली करावी तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तराची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची कार्यालयीन चौकशी होणार असून, चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि पुढील कोणती कारवाई केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!