Edition

आंबोली नांगरतास येथे भीषण अपघात; ट्रक-व्हॅगनार धडकेत दोघे जखमी _पत्रकार भरत केसरकर यांचे बंधू केशव केसरकर जखमी; संतोष धुरी यांना गंभीर दुखापत_

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संजय आगाशे प्रतिनिधी आंबोली : आंबोली-नांगरतास येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास ट्रक आणि व्हॅगनार कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघे जखमी झाले असून संतोष रामचंद्र धुरी यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

या अपघातात केशव दत्ताराम केसरकर (वय २७) आणि संतोष रामचंद्र धुरी (वय ३२), दोघेही रा. माणगाव-कट्टावाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, हे जखमी झाले आहेत. जखमी केशव केसरकर हे पत्रकार भरत केसरकर यांचे बंधू असल्याचे समजते.

उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार

अपघाताची माहिती मिळताच जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. विशाल रेड्डी तसेच ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. निखिल अवधूत यांनी जखमींची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. जखमींना आवश्यक औषधोपचार व इंजेक्शन देण्यात आले.

राजू मसुरकर यांची तत्पर मदत, अपघातानंतर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी जखमी रुग्णांसोबत उपस्थित राहून उपचारादरम्यान आवश्यक मदत व सहकार्य केले.

दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. संबंधित यंत्रणेकडून तपास करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!