

अनेक शालेय विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा व पालकांचा बहुसंख्येने सहभाग.
चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील दूधगंगा नदी महापूर आपत्कालीन व्यवस्थापनासाठी तैनात केलेल्या एन डी आर एफ टीमकडून विद्यार्थी प्रथमोपचार मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन दहावी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल टीम 10 /p चे टीम कमांडर इन्स्पेक्टर एन. गोपाल कृष्ण, हवालदार एस मल्लिकार्जुन, महेश बेदारी,प्रशालेचे मुख्याध्यापक गवंडी सर, सुरेशराव माने सर, चौधरी सर,ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, अझरुद्दीन शेखजी, कैलास माळगे, या मान्यवरांच्या हस्ते रोपांना पाणी घालून प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी प्रास्ताविकामध्ये अझरुद्दीन शेखजी यानी एन डी आर एफ टीमचे स्वागत करून, या विद्यार्थी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन व त्याचे महत्त्व समजावून सांगितले. जेष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी शालेय विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रथमोपचार अत्यंत महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले आणि तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले.
या प्रथमोपचार मार्गदर्शन वर्गामध्ये आपत्कालीन पूर परिस्थिती, भूकंप, सर्व प्रकारचे अपघात, हृदयाघात, रुग्णसेवा आपत्कालीन आगीचा सामना. इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभागातून मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. या प्रथमोपचार जागृती अभियानामध्ये सरकारी प्राथमिक शाळा मराठी, कन्नड सरकारी प्राथमिक शाळा, शासकीय माध्यमिक विद्यालय, मौलाना अब्दुल कलाम विद्यालय यातील अंदाजे 300 ते 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मार्गदर्शन वर्गामध्ये टीम कमांडर इन्स्पेक्टर एन. गोपाल कृष्ण, हवालदार बेदारी महेश, एस मल्लिकार्जुन, शिपाई होले अजिनाथ, रवी नाईक, भानसे प्रफुल्ल, मनीष कुमार, खुशाल भोयर,टी सुमंत,पी शंकरराव,हवालदार रेडिओ ऑपरेटर विवेक कुमार, चालक एन भास्करन, चालक पारसमणी सिंह.इत्यादींनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विविध प्रकारच्या प्रथमोपचाराच्या प्रकारांची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या प्रथमोपचार जागृती मार्गदर्शन वर्गासाठी शालेय विद्यार्थी पालक शिक्षक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक गवंडी सर यांनी मानले. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.











