Edition

नागपंचमी महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विनोद बोराडे मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे गेल्या १५ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या नागपंचमी महोत्सव २०२६ ला यंदा महिलांच्या प्रचंड सहभागामुळे अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दीदींनीही झोका खेळून या आनंदोत्सवात सहभागी होत महिलांसोबत मनमुराद आनंद लुटला.
रहाट पाळणा, संगीत खुर्ची, मक्याच्या कणसाची मेजवानी, फुगडी, नाव घेण्याची स्पर्धा, ‘एक मिनिट’ स्पर्धा अशा विविध उपक्रमांमध्ये महिलांनी अगदी बालपण पुन्हा अनुभवत मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाचा समारोप नरेंद्र राठोड यांच्या सुमधुर ऑर्केस्ट्राने झाला. संपूर्ण नागपंचमी महोत्सव आनंद, उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा झाला.महिलांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासाठी सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित महिला भगिनींनी विनोद बोराडे मित्र मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!