Edition

मातृत्व आणि बालसंगोपन हाच समृद्ध भारताचा पाया :- आमदार सत्यजित देशमुख

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन (सिद्धगिरी जननी), कणेरी मठ यांच्या वतीने ‘सिद्धगिरी जननी मॉडेल’वर आधारित राष्ट्रीय voluntary (स्वैच्छिक) उपक्रम “समृद्ध मातृत्व अभियान” या कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्ली येथील ‘कॉन्स्टीट्यूशन क्लब ऑफ इंडिया’ येथे अत्यंत उत्साहात करण्यात आले. या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सत्यजित देशमुख उपस्थित होते.

​या प्रसंगी परम पूज्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांची दिव्य उपस्थिती लाभली होती. तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील, गुलबर्गा येथील माजी खासदार डॉ. उमेश जाधव आणि डॉ. वर्षा पाटील या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.

​कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, “मातृत्व आणि बालसंगोपन हे केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून समृद्ध राष्ट्राच्या उभारणीचा पाया आहे. सिद्धगिरी जननी मॉडेलवर आधारित ‘समृद्ध मातृत्व अभियान’ ही केवळ एक योजना नसून, ती देशातील प्रत्येक मातेला उत्तम आरोग्य, योग्य मार्गदर्शन आणि सामाजिक पाठबळ देणारी एक अत्यंत दिशादर्शक राष्ट्रीय चळवळ ठरेल. कणेरी मठाच्या वतीने प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.”
​कार्यक्रमास उपस्थितांनी या अभियानाच्या ध्येय-धोरणांची माहिती घेतली. माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी देशभरात स्वैच्छिक पातळीवर व्यापक कार्य उभारण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!