Edition

भाजपाच्या किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी महेश खराडे यांची तर प्रदेश सरचिटणीस पदी पृथ्वीराज पवार यांची निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली/ प्रतिनिधी भाजपाच्या किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी महेश खराडे यांची तर प्रदेश सरचिटणीस पदी पृथ्वीराज पवार यांची निवड झाली आहे . तर राज्यकार्यकारणी सदस्य म्हणून रोहित चिवटे व संदीप जाधव यांची निवड करण्यात आली आहे .
या निवडी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी जाहीर केल्या .
सांगली जिल्ह्यातील निवडी साठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार आ सुधीर गाडगीळ ,आ सुरेश खाडे,आ गोपीचंद पडळकर, आ सत्यजीत देशमुख , जिल्हा अध्यक्ष ग्रामीण सम्राट महाडिक , शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग ,सरचिटणीस विलास काळेबाग यांनी पुढाकार घेतला . निवडीनंतर राज्य उपाध्यक्ष महेश खराडे म्हणाले भारतीय जनता पक्षाने शेतकऱ्याच्या साठी काम करण्याची मोठी संधी दिली आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुळेच मला ही संधी मिळाली आहे . या पुढच्या काळात सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्द राहणार आहे . शेतकऱ्याच्या साठी रचनात्मक काम करण्याचा निर्धार केला आहे . द्राक्ष , बेदाणा , ऊस ,दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल यावर या पुढच्या काळात भर राहणार आहे . संस्था उभारून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली . जिल्ह्यातील सर्व नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करून शेतकरी संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहोत .
प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज पवार म्हणाले शेतकऱ्याच्या प्रश्ना संबंधी धोरण ठरविण्याची संधी मिळाली आहे . त्या संधीचे सोने करू सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहोत . या पुढच्या काळात जिल्ह्यासह राज्यातील किसान मोर्चाचे संघटन मजबूत करू . रोहित चिवटे v संदीप जाधव यांनीही संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितलं .

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!