Edition

मलिकवाड येथे श्री.मल्लिकार्जुन (महादेव) मंदिराच्या चौकट पूजन सोहळ्याचे आयोजन.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मलिकवाड, ता.चिकोडी येथील ग्रामदैवत श्री.मल्लिकार्जुन (महादेव) मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्साहात सुरू आहे.मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या चौकट पूजन सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात येणार आहे.

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यामुळे ग्रामस्थ व भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोहळ्याची सुरुवात सकाळी 9 वाजता बसस्थानकापासून चौकटीची सवाद्य मिरवणूक काढून होणार आहे. मिरवणूक मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर सकाळी ११ वाजता श्री. मल्लिकार्जुन मंदिरात चौकट पूजनाचा धार्मिक विधी संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे परमपूज्य गुरुलिंग महास्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.मंदिरासाठी चौकट दिलेले देणगीदार श्री.गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक श्री.बाळासाहेब पाटील तसेच इतर देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थ, देणगीदार व भाविकांनी दिलेल्या योगदानामुळे हे कार्य गतीने सुरू आहे.श्री.मल्लिकार्जुन मंदिर हे मलिकवाड परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असून, मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे मंदिराला नवे स्वरूप प्राप्त होणार आहे. चौकट पूजन हा या जीर्णोद्धार कार्यातील महत्त्वाचा धार्मिक टप्पा असल्याने या सोहळ्याकडे ग्रामस्थांचे विशेष लक्ष लागले आहे. मिरवणूक, धार्मिक विधी आणि महाप्रसादाच्या आयोजनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
या सोहळ्यास ग्रामस्थ, भाविक, आजी-माजी सैनिक, ग्रामपंचायतीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी, महिला स्व-सहायता संघांच्या सदस्या तसेच परिसरातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. मल्लिकार्जुन (महादेव) मंदिर जीर्णोद्धार समिती व समस्त ग्रामस्थ, सैनिक मलिकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!