Edition

बांधकाम कामगारांच्या बंद केलेल्या योजना ताबडतोब सुरू करा कामगार संघटनांची निदर्शने

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इचलकरंजी प्रतिनिधी – बांधकाम कामगाराच्या बंद केलेल्या शैक्षणिक योजना व विविध योजना ताबडतोब सुरू करा या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आज प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली
. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध योजना सुरू होत्या मात्र 13 जुलै 2026 परिपत्रक काढून सदरच्या योजना बंद केल्या आहेत त्या ताबडतोब सुरू करा, सुविधा केंद्रा मध्ये नवीन नोंदणी, नुतनीकरण अर्जाचा कोठा वाढवा, आधार क्रमांक मध्ये दुरुस्ती नावाच्या स्पेलिंग मध्ये दुरुस्ती व इतर किरकोळ बाबीच्या दुरुस्तीचे अधिकार जिल्हा सुविधा केंद्रांना द्या आदी मागण्यांची निवेदन देण्यात आले
. यावेळी सदरचे निवेदन वरिष्ठ पातळी पाठवून पाठपुरावा करू असे आश्वासन शिरस्तेदार मा. संजय काटकर यांनी दिले.
. यावेळी आनंदा गुरव, राजेंद्र निकम, मदन मुरगुडे, सचिन साठे, बंडोपंत सातपुते, सचिन बिरांजे, शंकर नंदरगी, संगीता सिंग, संजय पुजारी, सुधीर अतिग्रे, मनीषा नाईक, सत्येजीत निंबाळकर, अमित वडर, तौफिक नाईकवडे आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!