Edition

प्रिन्स ची तेजश्री चौधरी अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रथम.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याच्या तालुकास्तरीय स्पर्धेत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी तेजश्री महेशकुमार चौधरी हिने “India’s Energy Basket by 2047” या विषयावर प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे तिची जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन गट संसाधन केंद्र, सेलू येथे करण्यात आले होते.सेलू तालुक्यातील एकूण १८ शाळांनी या विज्ञान मेळाव्यात सहभाग नोंदविला.यावेळी गटशिक्षण अधिकारी गजानन वाघमारे, विज्ञान विभाग प्रमुख पद्मावत मॅडम हे उपस्थित होते.तेजश्री चौधरी हिने भारताची २०४७ पर्यंतची ऊर्जा गरज, ऊर्जेचे विविध स्रोत, भविष्यातील ऊर्जा नियोजन तसेच शाश्वत ऊर्जेची गरज या विषयांवर अभ्यासपूर्ण व आत्मविश्वास पूर्ण मांडणी केली. तिच्या प्रभावी सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांनी तिला प्रथम क्रमांक घोषित केला. तेजश्रीच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य अनिल सर, अब्दुल सर व मीरा मॅडम, तसेच मार्गदर्शक शिक्षक रविशंकर कुमार यांनी तेजश्री चे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!