Edition

आज साजऱ्या होणाऱ्या शिराळ्याच्या नागपंचमीला ही जिवंत नागाचे होणार प्रदर्शन… यंदा ४१ ग्रामस्थांना नाग पकडण्याची केंद्रीय वन्यजीव विभागाची काही शर्ती-अटींवर परवानगी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – आज साजरा होणाऱ्या शिराळा येथील ऐतिहासिक नागपंचमी उत्सवामध्ये यंदा ही पारंपरिक नागपंचमी उत्सव रूपाची झलक पाहायला मिळणार आहे. नागपंचमीनिमित्त येणाऱ्या भाविकांना आज शिराळा नगरीत ४१ जिवंत नागांचे प्रदर्शन घडणार आहे. निसर्गचक्रातील नागांचे महत्व नागरिकांना समजावे आणि सर्पसंवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाचे प्रसारण व्हावे, या उद्देशाने केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने काही शर्ती व अर्टीवर ४१ ग्रामस्थांना नाग पकडण्याची परवानगी दिली आहे. गेल्यावर्षी २१ नागांना परवानगी देण्यात आली होती. यंदा त्यामध्ये वाढ करून ४१ नागांना परवानगी मिळाली आहे. शिराळा वनक्षेत्रातील ४१ ग्रामस्थांनी यासाठी परवानगी मागितली होती. आमदार सत्यजित देशमुख यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची दिल्ली येथे भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर ४१ अर्जदारांना नाग पकडण्यासाठी परवानगी देण्यात आली. ही परवानगी केवळ शैक्षणिक उद्देशाने तसेच स्थानिक नागरिक व समाजामध्ये सर्पसंवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञानाचे प्रसारण करण्यासाठी देण्यात आली आहे. या ४१ नागांना आज परवानगी मिळालेली ग्रामस्थ आणि मंडळाचे पदाधिकारी त्यांचे प्रदर्शन करतील.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!