Edition

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने ध्वजारोहण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी – संगमवाडी पुणे येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधी स्थळी 80 वा स्वातंत्र दिन साजरा झाला या ठीकाणी राष्ट्रध्वजाच ध्वजारोहण नगरसेविका निशाताई सचिन मानवतकर यांच्या हस्ते करणात आले. कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष अशोक भाऊ लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन करण्यात आले होते, कार्यक्रमांमध्ये रामदासभाऊ साळवे, यांनी स्मारकाबद्धल झालेल्या संघर्षमय आंदोलनाची माहिती दिली व या ठिकाणी अनेक क्रांतिकारक समाजसुधारक यांची क्रांतिभूमी असल्याने स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन व महापुरुषांचा हा स्वतंत्र मिळवण्यासाठी झालेला संघर्ष या संदर्भात माहिती दिली आणि त्यामुळे स्मारक समितीने गेले बारा वर्षापासून या स्मारक स्थळी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे याविषयी माहिती दिली अक्षरा मयुर खोले या चिमुकलेनी लहू वंदना गायली.
यावेळी राजू जाधव, भास्कर नेटके, अनि केत लोखंडे, हर्षद शिंदे, सुरज शेलार, गोविंद खंडागळे,ढवळे ताई,बंडू कदम, विशाल पवार, आकाश हनवते, शाम ढावरे,महादेव भडकवाड आदी यावेळी उपस्थित होते. लहुजी साळवे स्मारक समीतीचे संस्थापक, अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी प्रस्ताविक केले,आभार प्रदर्शन दीपक वायाळ यांनी केले

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!