


सदलगा प्रतिनिधी : (अनिलकुमार डेक्कनवर )
देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन सदलग्यात मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधानाचे शिल्पकार डॉ. बी.आर. आंबेडकर आणि संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. *सदलगाचे उप-तहसीलदार श्री. प्रभाकर शेलवंत सर* यांनी पूजा केली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी एकत्रितपणे “वंदे मातरम” हे राष्ट्रीय गीत गायले.
त्यानंतर सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. एस.आर. रोगी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत गायले.
कार्यक्रमात प्रथम श्रेणी महाविद्यालयाचे व्याख्याते श्री. चिदानंद शिंगे यांनी भाषण केले. ते म्हणाले, “स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान व्यक्तींचे आपण नेहमी स्मरण केले पाहिजे. देशाच्या सीमा सुरक्षित करणाऱ्या जवानांचे आपण ऋणी आहोत” असे सांगून त्यांनी मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली.
त्यानंतर शालेय मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
या कार्यक्रमाला नगरपालिकेचे सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि गावातील मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय एन.डी.आर.एफ. पथकाचे प्रमुख आणि सदस्य, पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, उप-तहसीलदार, महसूल निरीक्षक, नाड कचेरीचे कर्मचारी, उप-नोंदणी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी, हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि कर्मचारी, ग्राम प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी, पत्रकार, सदलगा नगरपालिका हद्दीतील सर्व शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच सदलग्याचे नागरिक आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: श्री. अनिलकुमार डेक्कनवर सर आणि श्री. महावीर हुद्दार सर आभार प्रदर्शन: श्री. संजीव गुडे यांनी केले.











