Edition

यड्राव येथे विविध ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव (प्रतिनिधी ) : येथे विविध ठिकाणी ८० वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कुमार व कन्या विद्यामंदिर — येथे कन्या विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक बाजीराव सुतार यांच्या हस्ते ध्वजाचे पुजन करण्यात आले. तर कुमार विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी औरंग शेख, नितीन बिरांजे, शालेय व्यवस्थापन कमिटीचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक स्टाफ, ग्रामस्थ व विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.
शरद विकास सेवा सोसायटी — येथे संचालक बबर कांबळे व देशभुषण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महावीर उर्फ बंडू पाटील, विकास दानोळे, आप्पासो लवाटे, सुधीर आदमाने, स्नेहल पाटील, भरत इंगळे, सोहेल नदाफ, सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय : येथे माजी सरपंच उल्हास भोसले यांच्या हस्ते ध्वजाचे पुजन करण्यात आले. तर महावीर उर्फ बंडू पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक – निबांळकर, प्रकाश अकिवाटे, चंदू पडियार, माजी सरपंच सरदार सुतार, माजी उपसरपंच शिवाजी दळवी, शिवाजी निबांळकर, संदिप गणबावले, ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर, सर्व अंगणवाडी सेविका – मदतनीस, सर्व ग्रा. प. सद्स्य, ग्रा.प. कर्मचारी,व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदाबहार ग्रामिण नागरी पत संस्था : येथे पोलीस पाटील जगदिश सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा. अशोक रेंदाळे, व्हा.चेअरमन आप्पासो पाटील, सुधीर तुपारे, शरद चाफेकर, नरसू घाट, कल्लाप्पा कुंभार, मोहन माने, विष्णू काकडे, रंजना यादव, अर्चना ढोणूक्षे, अजीत पाटील, पटू कुंभोजे, कल्लू चव्हाण, शौकत मोमीन, सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
नाईक – निबांळकर विकास सेवा सोसायटी : येथे उज्वला पाटील यांच्या हस्ते ध्वजाचे पुजन करण्यात आले. तर सरीता माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सद्स्य राजवर्धन नाईक – निबांळकर, चेअरमन विलास माने, व्हा. चेअरमन रमेश पाटील, चौवगोंडा पाटील, बाळू घाटगे, सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते. तलाठी कार्यालय : येथे तलाठी गणेश आवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विजय कोळी, अजीत पाटील, व ग्रामस्थ उपस्थित होते.
पार्वती विद्यामंदिर आरकेनगर : येथे ग्रा.प. सद्स्य बाबासाहेब राजमाने यांच्या हस्ते ध्वजाचे पुजन करण्यात आले. तर एफ. आय. ई. कंपनीचे मॅनेंजर सुहास मगदूम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. . यावेळी माजी उपसरपंच सौ. प्राची हिंगे, ग्रा.प. सद्स्या वंदना कदम, शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा अक्षता उपाध्ये, रत्नाकर पडियार, अशोक भुजवडकर, अजित करडे, मुख्याध्यापिका सुषमा लोखंडे, सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी – विद्यार्थींनी उपस्थित होते.
शामराव पाटील (यड्रावकर ) हायस्कूल : येथे भारतीय जैन संघटना इंचलकरंजीचे पारस वागोणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा. आण्णासाहेब क्वाणे, आशिष शहा, अशोक ढेलरीया, अशोक कुडचे, परेश कांगटाणी, संचालक संजयकुमार क्वाणे, मुख्याध्यापिका मनिषा पाटील, कोरोची हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा क्वाणे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!