Edition

बेडकिहाळ विविध ठिकाणी येथे स्वातंत्र्य दिन साजरा.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बेडकिहाळ प्रतिनिधी — येथील सार्वजनिक चौकातील ध्वजारोहन ग्राम विकास अधिकारी प्रकाश धनगर. यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग,ग्रामस्थ तसेच माजी ग्राम पंचायत सदस्य, सदस्या. अंगणवाडीच्या कार्यत्या उपस्थित होत्या. तर ग्राम पंचायत कार्यालयात कार्यदरशी प्रकाश सनदी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.कामगारांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तसेच येथील चावडी कार्यालयातील ध्वजारोहण ग्राम तलाठी महसूल अधिकारी एस एन नेमान्नावर, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. येथील व्हीपीकेएस मध्ये अध्यक्ष पासगौडा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर विराचार्य अल्फ संख्याक सौहार्द संघाचा ध्वजारोहन अध्यक्ष संजय पाटील यांनी केले. तर बिरेश्वर सौहार्द शाखेत भारतीय सैन्य दलातील जवान अमर पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर शिवनेरी ताराराणी संघात ध्वजारोहण मलगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दोन्ही संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. तर येथील अर्बन बँकेच्या ध्वजारोहण संचालक शामराव बत्ते यांच्या हस्ते करण्यात आले,या वेळी अध्यक्ष व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. येथील बी एस संयुक्त पूर्व विद्याल, हायस्कूल, कन्नड , इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेचा ध्वजारोहण बाबासाहेब खोत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी यश प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींना विविध मान्यवरांच्या कडून देण्यात आलेल्या रोख रक्कम व प्रमाण पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . तर एनसीसी छात्रांचा मानवंदनाचा कार्यक्रम आकर्षक ठरला.
तर सर्कल परिसरातील सरकारी कन्नड,मराठी व उर्दू प्राथमिक शाळा परिसरातील ध्वजारोहण मराठी शाळेचे एसडीएमएससीचे अध्यक्ष प्रमोदकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर कुसुमावती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयात प्रमुख पाहुणे पासगौड पाटील यांच्या हस्ते करण्यात.अध्यक्ष जयकुमार खोत हे होते. या वेळी एनसीसी विद्यार्थ्यांच्या वतीने कवायत व मानवंदना झाली. येथील व्यंकटेश्वरा पावर प्रोजेक्ट साखर कारखान्यात राहुल मेहता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी कारखान्यातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!