
कोल्हापूर प्रतिनिधी – सेवाशक्ती संघर्ष संघटनेच्या एसटी कर्मचारी विभागीय मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर, हक्कांवर आणि प्रलंबित न्याय्य मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
रयत क्रांती संघटना महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष दीपकदादा भोसले, सेवाशक्ती संघर्ष एसटी संघटनेचे सरचिटणीस सतीश मेटकरी, सहकार्याध्यक्ष प्रल्हाद सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला. यावेळी महेश पाटील, राम मुंडे, अमोल तांबेकर, भरत चव्हाण, विनोद पाटील, संदीप कांबळे यांच्यासह एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान विविध आगारांतील अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी सेवाशक्ती संघर्ष संघटनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या संघटित लढ्याला आणखी बळ मिळाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा-सुविधा, हक्क, वेतन व अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि सन्मानासाठी संघर्ष सुरूच राहणार, असा निर्धार आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.











