Edition

येडेनिपाणीत क्रांतिवीर पांडू मास्तर स्मारकस्थळी स्वातंत्र्यदिन उत्साहात..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे थोर क्रांती सेनानी पांडू मास्तर यांच्या स्मारकस्थळी शनिवारी (दि. १५) सकाळी ७.३० वाजता ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच क्रांतिवीर पांडू मास्तर वाचनालय येथेही ध्वजवंदन करण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नॅशनल अवॉर्ड प्राप्त माजी सैनिक संजय कुंडलिक जाधव (वशी) यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी माजी सैनिक सुनील बाबासाहेब पाटील (कामेरी), अशोक दिनकर थोरात (येडेनिपाणी) व अशोक शामराव पाटील (येडेनिपाणी) उपस्थित होते.
कार्यक्रमास येडेनिपाणी गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते रामराव शेवाळे, सिताराम पाटील, अधिक जाधव, अशोक पाटील, अर्जुन पाटील, विश्वास पाटील, राहुल पाटील, बाळासाहेब पाटील (वशी), नंदकुमार कोळी, सुनील जोशी, अविनाश वायदंडे, धनाजी पाटील, सुनील पाटील, बाळासाहेब देवकर, सर्जेराव जाधव, विजय बनसोडे (माजी सरपंच), नायकू पाटील, मनोहर जाधव व नंदकुमार पाटील (माजी पंचायत समिती सदस्य) यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी सैनिकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमही घेण्यात आला. पांडुरंग पाटील, बाबासाहेब मदने, संपत गुरु व अमोल गुरव यांच्यासह उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
क्रांतिवीर पांडू मास्तर यांच्या स्मारकस्थळी झालेल्या या कार्यक्रमातून देशभक्ती, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!