Edition

जयंतराव पाटील यांचा थेट एसटी आगारात Gen Alpha शी संवाद!.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एसटी बसेसचे वेळापत्रक, पास सुविधा आणि इतर समस्यांची केली विचारणा

ईश्वरपूर प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्उरुण ईश्वरपूर एसटी आगारात आज माजी मंत्री जयंतराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह राजामाता जिजाऊ या बसेसचे लोकार्पण करण्यासाठी दाखल झाले होते. त्यावेळी एसटी आगारात तरुण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या दरम्यान जयंतराव पाटील थेट विद्यार्थ्यांमध्ये गेले आणि त्यांच्याशी संवाद साधला.याचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी थेट ईश्वरपूर एसटी बस आगारात तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. विद्यार्थी आणि जयंतराव पाटील यांच्यातील हा संवाद लक्षवेधी ठरत आहे.

उरुण ईश्वरपूर एसटी आगारात आज माजी मंत्री जयंतराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह राजामाता जिजाऊ या बसेसचे लोकार्पण करण्यासाठी दाखल झाले होते. त्यावेळी एसटी आगारात तरुण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या दरम्यान जयंतराव पाटील थेट विद्यार्थ्यांमध्ये गेले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

सध्या रस्त्यांची दुरवस्था, एसटी बसेसचा तुटवडा आणि शाळेत जाताना येणाऱ्या विविध अडचणींबाबत सोशल मीडियावर Gen Z आणि Gen Alpha मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहेत. आपली येणारी पिढी प्रचंड जागरूक असल्याचे सांगत जयंतराव पाटील यांनी वेळोवेळी तरुणांचे कौतुक केले आहे. आज तरुण मोठ्या प्रमाणात एसटी आगारात उपस्थित असल्याने त्यांनी थेट तरुणांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणे पसंत केले.

दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनीही मुक्तपणे जयंतराव पाटील यांच्याशी संवाद साधला व आपल्या समस्या मांडल्या. अनेक विद्यार्थ्यांनी बसच्या वेळापत्रकाबाबत समस्या आहेत, बसच्या पासचा प्रश्न आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांना रस्त्याची समस्या आहे. जयंतराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणं ऐकून घेत या समस्यांवर शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!