Edition

चांदोली वारणा धरणावर तिरंगी रोषणाई; लेझर शोमधून साकारला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चांदोली (ता. शिराळा) येथील वारणा धरण ‘वसंत सागर’ जलाशय परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. वारणा धरणाच्या वक्राकार दरवाजांवर करण्यात आलेल्या तिरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला, तर भव्य दगडी भिंतीवर साकारलेल्या लेझर शोमधून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर उलगडला.
कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या वतीने या विशेष विद्युत रोषणाईचे आयोजन करण्यात आले होते. जलाशयाच्या भव्य दगडी भिंतीवर स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारकांचे बलिदान आणि देशाच्या स्वातंत्र्याचा प्रवास लेझर शोच्या माध्यमातून सादर करण्यात आला.
या लेझर शोचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. रात्रीच्या वेळी तिरंगी प्रकाशाने उजळलेले धरण आणि लेझर शोमधून साकारलेला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
वारणा धरणाच्या निसर्गरम्य परिसरात तिरंग्याच्या रंगांची रोषणाई आणि देशभक्तीपर लेझर शो यामुळे वातावरण भारावून गेले. हा अनोखा प्रकाशोत्सव उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चांदोली वारणा धरणावर देशप्रेमाचा अनोखा जागर पाहायला मिळाला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!