
गांधीनगर/प्रतिनिधी:उदय साळुंखे
गडमुडशिंगी ता. करवीर गावातील शासकीय हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून, ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील तुंबलेल्या गटारींमुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे, तर दुसरीकडे मोठाले खड्डे पडल्याने वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पदाधिकारी याच गावचे असूनही, त्यांच्या दुर्लक्षामुळे येथील समस्या जैसे थे आहेत. स्थानिक प्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे त्वरित ध्यान द्यावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे.











