Edition

नागपंचमी, ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर कुरळप पोलिसांचे रूट मार्च..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली वृत्तसेवा – नागपंचमी तसेच आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुरळप पोलीस ठाण्याच्या वतीने कुरळप व चिकुडे गावात रूट मार्च व पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले.
सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार, तसेच अपर पोलीस अधीक्षक आणि इस्लामपूर-ईश्वरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रूट मार्च घेण्यात आले. यावेळी पोलिसांकडून दंगा काबू योजना देखील राबविण्यात आली.
नागपंचमी आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत व उत्साहात पार पडावेत, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने पोलिसांनी कुरळप व चिकुडे गावातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केले.
या रूट मार्चमध्ये विभागातील पोलीस अधिकारी, आरसीपी पथकातील जवान तसेच संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांच्या या संचलनामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!