Edition

शिराळा येथे तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी :-
युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा क्षमतेचा, प्रगतीचा, युवाच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र होईल. असा विश्वास रेणुकादेवी देशमुख यांनी व्यक्त केला.
शिराळा शहर येथे हर घर तिरंगा अभियान अंतर्गत शिराळा मुख्य मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
या यात्रेमध्ये माजी सभापती हणमंतराव पाटील,शिराळाचे नगराध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे,सुखदेव पाटील,के.डी.पाटील, नगरपंचायत शिराळा महिला व बालकल्याण सभापती सुनीता पाटील, गटनेत्या प्राजक्ता कुलकर्णी, शिराळा मंडळाध्यक्ष कुलदीप निकम,शिराळा ग्रामीण मंडळ अध्यक्ष सत्यजित पाटील, बाजीराव देशमुख शंकर गायकवाड संजीव मोरे साहेब, जय हिंद आजी-माजी संघटनेचे पदाधिकारी, रॉयल अकॅडमी शिराळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सौ. रेणुकादेवी देशमुख म्हणाल्या :- प्रधानमंत्री मोदींनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित महाराष्ट्र उभा करायचा आहे.महाराष्ट्र विद्यानगरी,महाराष्ट्राची नवोन्मेशाची तसेच महाराष्ट्र उद्योग नगरी आहे. भारताचं एक सांस्कृतिक बलस्थान आहे. या युवाशक्तीच्या भरोशावर उद्याचा भारत आपण पाहणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!