
खोतवाडी तालुका हातकणंगले येथे त्वचा आणि केसांशी संबंधित विविध समस्यांवर आधुनिक उपचार व सौंदर्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘आयत सौंदर्य क्लिनिक’ १३ ऑगस्टपासून नागरिकांच्या सेवेत सुरू झाले आहे. त्वचा, केस आणि लेझर उपचारांसाठी हे क्लिनिक नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
क्लिनिकमध्ये मुरुमांचे खड्डे, वांग, चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्यांखालील वर्तुळे, चेहऱ्यावरील काळे डाग यांसह त्वचेशी संबंधित विविध समस्यांवर उपचार केले जाणार आहेत. तसेच केस गळणे, कोंडा आणि केसांची वाढ खुंटणे यांसारख्या समस्यांवरही मार्गदर्शन व उपचारांची सुविधा उपलब्ध आहे.
याशिवाय स्किन मेडिफेशियल, हेअर पीआरपी, टॅटू रिमूव्हल, केमिकल पीलिंग, मायक्रो नीडलिंग, मुरुमांवरील उपचार, चामखीळ काढणे तसेच मस्सा व तीळ काढणे अशा विविध सुविधा क्लिनिकमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आयत सौंदर्य क्लिनिकचे उद्घाटन नगरसेवक श्री. उदयसिंह पाटील, श्री. वाजीद तासगावे, रणजीत जाधव (इचलकरंजी महानगरपालिका), खोतवाडीचे माजी उपसरपंच श्री. गजानन नलगे, सरपंच श्री. विशाल कुंभार, डॉ. बी. एम. आरगे, श्री. रमेश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
डॉ. साहील आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्लिनिक सुरू झाले असून, त्वचा व केसांच्या समस्यांसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी विविध उपचार व सौंदर्यविषयक सुविधा मिळणार आहेत.
पत्ता : लाटकर गल्ली, खोतवाडी.












