Edition

32 शिराळा नागपंचमी नागदेवतेच्या मानाच्या पालखीची पारंपरिक परंपरा…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – गोरक्षनाथ महाराजांनी इसवीसन आठव्या शतकात शिराळ्यात वास्तव्यास असताना जीवंत नागाच्या नागपंचमीची परंपरा सुरू केली. हि परंपरा दशग्रंथी ब्राह्मण महाजन (सध्या पांडुरंग लक्ष्मण महाजन) यांचे घरापासून सुरु झाली. आजही परंपरागत नागदेवतेची पालखी महाजन यांच्या घरातून निघते. या मानाच्या पालखीची तयारी पंधरा दिवस आधीपासून सुरू होते. शिराळा ग्रामदेवतेचे पुजारी गुरव अमावसेच्या दिवशी नाग मूर्तीची लिंबू, माती, रांगोळी आणि राख यांच्या सहाय्याने स्वच्छता करतात. त्यानंतर नागपंचमीच्या एक दिवस आधी महाजन कुटुंबीय पंचधातूची नाग मूर्ती ब्रासो वापरून चकचकीत करतात आणि मूर्तीला पारंपारिक मनमोहक रंगांनी रंगवतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी पालखी भोई बांधव कडून तोरणा ओढ्याला स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर पालखीची सजावट पारंपरिक वस्त्रालंकारांनी केली जाते. सकाळी पालखीचे मनोभावी मंत्रोपचार ने विधिवत पूजा केली जाते. यानंतर पालखीचे मानकरी पांडुरंग महाजन यांच्या घरी प्रथम पूजन पूर्ण होते. यानंतर पालखी गुरुवार पेठ, कुरणे गल्ली मार्गे सोमवारपेठेतील मरीमीआईच्या मंदिरात पूजे साठी थांबते . त्यानंतर ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरात पालखीची पूजा आणि आरती होते.

सायंकाळी पालखी कासार गल्ली मार्गे, वैजेश्वर मंदिरात जाते, तिथे तिचे पूजन होते आणि रात्री उत्तर पूजेसाठी पालखी परत महाजन यांचे घरी येते.

शिराळा गावातील या परंपरेमध्ये सर्व समाजाने बारा बलुतेदारांना सहभागी होण्याची परंपरा आहे. यामध्ये पालखी उचलण्याचा मान भोई समाजा आहे. जिवंत नाग पकडून आणणे चा मान कोतवालांचा आहे. पालखी सोबत काकडा किंवा दिवा चा मान काकडे लोकांचा आहे. पालखी सोबत सनई चा मान घडशी चा आहे. गुरव शिंग चा मान गुरवांचा आहे. ढोल चा मान धनगर यांचा आहे. पूजा सांगण्याचा मान जोशी यांचा आहे, धातुरूप नाग पालखी मध्ये ठेवणेचा मान सोनार यांचा आहे. पालखी साठी फुले आणि माळा पुरवण्याचा मान माळी समाजा यांचा आहे. डवरी यांचा मान डमरू वाद्य वाजवणे साठी आहे. महार समाजा यांचा मान पालखी साठी दोरी बनवून देणेचा आहे. लाकडी पालखी ची दुरुस्ती करण्याचा मान सुतार यांचा आहे. नागपंचमी पालखी साठी तोरण देण्याचा मान मांग समाजाचा आहे. पालखी आणि नागाची पूजा करून नागपंचमीची सुरुवात करण्याचा मान महाजनांचा आहे. पालखीमधील नागदेवतेची मूर्ती ही जागृत देवस्थान आहे. नवसाला पावण्याची अखंड परंपरा गेली कित्येक वर्ष सुरू आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!