Edition

इचलकरंजी पुरवठा कार्यालयात खाजगी व्यक्तीला सोबत घेऊन रात्री उशिरापर्यंत कामकाज!तहसीलदारांची परवानगी नसल्याचे स्पष्ट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इचलकरंजी प्रतिनिधी – मिनाज सनदी. इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या पुरवठा कार्यालयात कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे,दि. ७/८/२०२६ रोजी हे कामकाज पुरवठा कार्यालय मधील ( शिपाई) संकेत जाधव हे एका खाजगी व्यक्तीला कार्यालयात घेऊन काम केले जात असल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकारास अप्पर तहसीलदारांची पूर्वपरवानगी नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शासकीय कार्यालयांमध्ये अधिकृत अधिकारी व
कर्मचाऱ्यांमार्फतच कार्यालयीन कामकाज होणे अपेक्षित असताना कार्यालयीन वेळेनंतर खाजगी व्यक्तीच्या उपस्थितीत कामकाज सुरू असल्याने या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. संबंधित खाजगी व्यक्तीला कार्यालयात कोणत्या अधिकाराने प्रवेश देण्यात आला? त्याच्याकडून नेमके कोणते काम करून घेतले जात आहे?तसेच या कामाची जबाबदारीकोणाची? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.कार्यालयीन वेळ संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कोणत्या फाईली, अर्ज किंवा प्रकरणांवर काम करण्यात आले, याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे का, याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच कार्यालयातील उपस्थिती नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, कार्यालयीन वेळेबाहेरील कामकाजासंदर्भातील आदेश व परवानगी आणि संबंधित कामाची नोंद तपासण्याची मागणी होत आहे.
विशेष म्हणजे याकामकाजास अप्पर तहसीलदारांची परवानगी नसल्याचे स्पष्ट होत असल्याने संबंधितअधिकारी-
कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ
प्रशासनाच्या आदेशांना डावलून कामकाज केले आहे का, याची चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.पुरवठा विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाचा विभाग असल्याने येथे पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने कामकाज होणे अपेक्षित आहे. मात्र, कार्यालयीन वेळेबाहेर खाजगी व्यक्तीच्या उपस्थितीत कामकाज सुरू असल्याच्या प्रकारामुळे पुरवठा विभागात मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. यावर अप्पर तहसीलदार काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!