Edition

09 ऑगस्ट क्रांती दिवस रोजी भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी – विविध वस्तू विक्री कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन, शाखा कोल्हापूर यांच्या वतीने क्रांती दिनानिमित्त कावळा नाका, कोल्हापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दररोज गावोगावी फिरून कष्टाचे काम करणारे विक्री प्रतिनिधी, तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचारी व भगिनी यांच्या सहभागातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. विक्री कर्मचारी बांधवांना शासन व प्रशासनाकडून आवश्यक त्या कल्याणकारी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, दुर्घटनेच्या प्रसंगी गरजू व्यक्तींना जीवनदान मिळावे आणि समाजाप्रती आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडता यावे या उद्देशाने असोसिएशनने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्प केला आहे.
असोसिएशनच्या वतीने सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की, या रक्तदान शिबिरात उपस्थित राहून रक्तदान करावे आणि आपल्या रक्तदानातून एखाद्याला नवजीवन देण्याच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे.
या उपक्रमाचे प्रमुख आयोजक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री यासीन उमराणी सांगली जिल्हा अध्यक्ष श्री राहुल सुतार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री पीटर डिसूजा उपाध्यक्ष श्री सागर पाटील,श्री परशुराम बिराजदार यांनी सर्व नागरिक, सामाजिक संस्था, विक्री प्रतिनिधी बांधव व भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!