Edition

पोलंडच्या शिष्टमंडळाची वळिवडे म्युझियमला भेट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर:- पोलंडचे राष्ट्रपती ऑक्टोबर महिन्यामध्ये वळिवडे (ता. करवीर) येथे भेट देणार आहेत. त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलंडच्या संसद सदस्या आणि पोलंड-भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा किंगा गायेव्स्का यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने वळिवडे (ता करवीर) येथील म्युझिमला भेट दिली.
शिष्टमंडळाचे स्वागत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मीन यांनी केले. शिष्टमंडळामध्ये किंगा गायेव्स्का यांच्यासोबत पोलंडचे वाणिज्यदूत तोमास्झ विएलगोमास, मालगोर्झाता वायसिस-गोवेंबियाक, अलेक्झांड्रा ओस्मान्स्का, कॅरिलना वोज्सिस्का आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी दयानंद कारंडे हिने पोलीश भाषेमध्ये आपले मनोगत व्यक्त करुन पोलीश पाहुण्यांची मने जिंकली. त्यावेळी पोलंडचे पाहुणे भावूक झाले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर सर्वांनी म्युझियमच्या जागेची पाहणी केली. यावेळी कोल्हापूरचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, शहाजीराचे छत्रपती, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा परिषदेच्या थंकंत्राटी अर्थ समितीच्या सभापती सारिका नांदेकर, वळिवडेच्या सरपंच रुपाली कुसाळे, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, करवीरचे गटविकास अधिकारी संदीप भंडारी, विस्तार अधिकारी बी. डी. पाटील, डॉ. शरद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष इंगवले, निवास तामगावे, विक्रम मोहिते, उदय पाटील, कपिल घाटगे, रितू लालवानी, पूनम परमानंदानी, सनी चंदवानी, अमित बठेजा, ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील महेश खाडे, तसेच वळिवडे, गांधीनगर परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!