Edition

के. बा. विद्यालयात गुणवंताचा गुणगौरव.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : दि. ०७ ऑगस्ट रोजी सेलू येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष ऍड अनिरुद्ध जोशी यांची उपस्थिती होती तर प्रसिद्ध कवी व कथाकार मधुकरराव उमरीकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती .
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी ,सचिव महेशराव खारकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.जयश्री सोन्नेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला .तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय धारसुरकर यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून शाळेचा चढता शैक्षणिक आलेख स्पष्ट केला .याप्रसंगी संस्थेचे सचिव महेशराव खारकर व उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी यांनी मनोगतात स्पष्ट केले की ,
विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या प्रयत्नासोबतच पालकांचे संस्कार व शिक्षकांचे प्रयत्न देखील महत्वाचे आहे . त्यामुळे आजचा गुणगौरव हा केवळ विद्यार्थ्यांचा नसून त्या सर्व घटकांचा आहे .यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .यावेळी मनोगतात मधुकर उमरीकर यांनी सांगितले की,”माझा “शब्द लागला की त्याचे प्रेम लागते .त्यामुळे सुब्बाराव यांनी भारताबद्दल भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा लिहिली आहे . असे उमरीकर यांनी सांगितले. त्यांनी यावेळी साने गुरुजी यांच्या श्यामची आई या पुस्तकातील वडाला प्रदक्षणा व विहिरीतील पोहण्याची रंजक कथा तसेच आईच्या मृत्यूची अत्यंत भावनिक कथा सविस्तरपणे सांगितली . व विद्यार्थ्यांना अक्षरशः भारावून टाकले . भारत मातेचे व देश प्रेमाचे महत्व देखील पटवून दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच शैक्षणिक व स्पर्धा परीक्षेचे घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकासोबत प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला .संघर्षाशिवाय यश नाही व यशाशिवाय कीर्ती नाही . असे स्पष्ट करून ऍड अनिरुद्ध जोशी यांनी अध्यक्षीय समारोपात आज यश संपादन करून गुणगौरव करण्यात येत असलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .इतर विद्यार्थ्यांनी देखील त्यांची प्रेरणा घेऊन भविष्यात वाटचाल करावी असे आवाहन केले . तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले तर योगेश ढवारे यांनी गुणवंत विद्यार्थी यादी वाचन केले .दिलीप बेदरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!